ती तिच्या सख्यांची लाडकी
तोही आपल्या वर्तुळात लोकप्रिय
तो हळुवारशा कविता करतो,
मैफिली दोस्तांच्या गाजवतो.
तिचाही गळा म्हणे गोड आहे,
भावगीतांचं तिला वेड आहे.
तो आहे अभिजात रसिक,
मोठ्या मनाचा, विचारी…. अन बरंच काही
तिची विशेषणं – मनमिळाऊ, समजूतदार
शांत, करारी….. अन असंच काही
…….
तो वक्तशीर, व्यवस्थित
ती टापटिपीची, नियमित
कार्यालयं नेटकी त्यांची,
मात्र घडी विस्कटलीय प्रपंचाची..
……..
छान-छान सगळं घराबाहेर….
ते जिथे येतात एकत्र
त्या घरात मात्र, दिवस-रात्र
रुक्ष, गद्य नूर खेळाचा,
देता-घेता घरचे अहेर
हरवलाय सूर वाद्यमेळाचा
त्याचा झालाय कप तुटक्या कानाचा,
तिच्या संसाराच्या भांड्याला आलाय पोचा..
……..
आपापल्या भ्रमणकक्षेत, चारचौघांत
दोघे फिरतात एकाच परिघांत
आणि ह्या एकेकाळच्या अनुरुप दोघांत
एक इवलासा दुवा, कावराबावरा, टकमक पहात..
त्याच्या बाजूने निघून जातात
वाटोळं झालेल्या घरच्या त्रिकोणात
दोन समांतर रेषा दोघांच्या ,
एकमेकांना त्या कधी भेटायच्या ?
22 02 2008 at 7:41 सकाळी |
बऱ्याच कविता वाचला. मराठीतल्या बऱ्याच आवडल्या.
लिहीत रहा.
मला स्वत:ला कवित करायला अजिबात येत नाहीत आणि त्यामुळे ज्यांना जमतात (कविता करणाऱ्या सगळ्यांनाच त्या जमतात आणि झेपतात असं नाही), त्यांचा हेवा वाटतो.
एनीवे – कीप इट अप.
22 02 2008 at 9:45 pm |
अभिप्रायाबद्दल आभार !
त्या निमित्ताने तुमच्या ब्लॉगची ओळख झाली. तुमचं ” आठवण आठवण – जय मल्हार ” वाचायला सुरुवात करतोय.
भेटूच,
सतीश वाघमारे
01 03 2008 at 11:01 pm |
khup chan,manachi honaro kondi tagmag doghancha abola,var varcha dikhawa anni chimuklya jivachi tagmag chan jamliye.
01 03 2008 at 11:11 pm |
तुमचे मनःपूर्वक आभार !
सतीश वाघमारे
14 04 2008 at 11:11 सकाळी |
आणि ह्या एकेकाळच्या अनुरुप दोघांत
एक इवलासा दुवा, कावराबावरा, टकमक पहात..
Hya don lines khoopach kahi saangun gelya…
14 04 2008 at 2:33 pm |
ti chaya badhal pan ka hi tari ADD kara ————-
30 04 2009 at 4:27 सकाळी |
कविता छान आहे. आजकालचे काहीसे सत्य.
30 04 2009 at 11:44 सकाळी |
अभिप्रायाबद्दल आभार !